मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कॉलेज ऑफ एज्युकेशन,अक्कलकोट,सन 2007 मध्ये अक्कलकोट तालूक्यातील एकमेव शिक्षणशास्त्र (बी.एड) महाविदयालयाची स्थापना
करणारे मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री मा.सिध्दारामजी म्हेत्रे साहेब व शिक्षण क्षेत्रातील अचूकता व दूरदृष्टी जाणणारे उपाध्यक्ष मा.अमोल जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजची स्थापना झाली.
समाजातील दुर्बल,वंचित,गरीब घटकांना शिक्षण उपलब्ध करुन देणे हे संस्थेचे एक उद्दिष्ट आहे. महाविदयालयाला आधुनिक सुविधांनीयुक्त्, सुसज्ज् इमारत असून स्वतंत्र समृध्द ग्रंथालय,आधुनिक उपकरणांनी युक्त अशी सुसज्ज्विज्ञान प्रयोगशाळा,मानसशास्त्र प्रयोगशाळा,शैक्षणिक तंत्रविज्ञान कक्ष व भव्यक्रीडांगण आहे.महाविदयालयाच्या समृध्द ग्रंथालयात 2925 संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत.महाविदयालयाचा संगणक विभाग देखील सुसज्ज् आहे.
म्हेत्रेसाहेब व जोशी सरांची ग्रामीण भागातील होतकरु,गरीब विदयार्थ्यांविषयी सतत तळमळ,त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना अचूक मार्गदर्शन व दिशा देतात.आपल्या कामामध्ये व्यस्त् असताना सुध्दा विदयार्थ्यांचा विकास व ग्रामीण भागाची प्रगती या गोष्टीकडे लक्ष देतात.कॉलेजचा विकास करताना आर्थिक बाबीतील नफा-तोटाचा विचार न करता “विकास हाच ध्यास” या हेतूने सतत प्रयत्न करत असतात.
महाविदयालयामध्ये विदयापीठाने ठरवून दिलेल्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जातात. महाविदयालयातून बाहेर पडणारा विदयार्थी हा कृतीशील शिस्तबध्द,अध्यापन कुशल व कार्यक्षम शिक्षक तयार झाला पाहिजे या दृष्टीने तात्विक भागाइतकेच प्र्रात्यक्षिक भागामध्ये विविध कृतीसत्राचे आयोजन केले जातात.
“समाजसेवा हीच ईश्रवरसेवा” या उक्तीप्रमाणे समाजसेवा शिबिराच्या माध्यमातून विदयार्थ्यांना समाजसेवेचे समाजाशी असलेली आपली बांधिलकी समजून घेण्याचे धडे अतिशय प्रयत्नपूर्वक दिले जातात. महाविदयालयात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मराठी दिन,हिंदी दिन,इतिहास दिन,भूगोल दिन,विज्ञान दिन,पर्यावरण दिन,थोरामोठयांची जयंती व पुण्यतिथी या निमितताने नामांकित वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते.महाविदयालयाच्या परीक्षांमधील निकालाची उज्ज्व्ल परंपरा सातत्याने टिकून आहे.
महाविदयालयाची भविष्यातील प्रगती व वर्षभराच्या वाटचालीत स्ंस्था व संस्थेचे अध्यक्ष मा.सिध्दाराम म्हेत्रेसाहेब व उपाध्यक्ष मा.अमोल जोशी सर यांचे मला सतत सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.त्यांचे मार्गदर्शन व त्यांची प्रेरणा अखंडपणे मिळत राहो व महाविदयालयाच्या प्रगतीची घोडदौड सतत गतिमान व्हावी ही स्वामी चरणी प्रार्थना…